अहवालात खुलासा – ‘Pfizer-Moderna लसीमुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत नाही’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमेरिका । एका नवीन अभ्यासामध्ये असे म्हटले गेले आहे की, कोविड -19 (Corona Vaccine) ची फायझर आणि मॉडर्ना (Pfizer-Moderna) ही लस पुरुषांच्या प्रजननावर परिणाम करत नाही. या अभ्यासामध्ये असेही म्हटले गेले आहे की,’ ही लस घेतलेल्या लोकांमध्ये शुक्राणूंची पातळी निरोगी राहते.’ जामा या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या अभ्यासामध्ये 18 ते 50 वयोगटातील 45 निरोगी लोकांचा समावेश आहे. ज्यांना फायझर-बायोटेक आणि मॉडर्नाची एमएआरएनए कोविड-19 लस मिळणार होती. या अभ्यासामध्ये, सहभागी असलेल्यांची आधीच तपासणी करून हे देखील पहिले गेले कि, त्यांना प्रजननाशी संबंधित पूर्वी कसली समस्या तर नव्हती.

यात 90 दिवसांपूर्वीपर्यंत कोविड -19 ग्रस्त किंवा लक्षणे असणार्‍या लोकांचा समावेश नव्हता. यामध्ये सहभागी पुरुषांकडून त्यांना लसीचा पहिला डोस देण्यापूर्वी वीर्याचे नमुने घेण्यात आले आणि दुसर्‍या डोसच्या सुमारे 70 दिवसानंतर पुन्हा वीर्याचे नमुने घेण्यात आले. या संशोधनात असे दिसून आले आहे की, लोकांना लसीचे दोन डोस मिळाल्यानंतरही त्यांच्या शुक्राणूंची संख्या प्रभावित झाली नाही.

अमेरिकेच्या मियामी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार या अभ्यासाच्या एका लेखकाने म्हटले आहे की,” लोकांना लस घेण्यास संकोच वाटण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या प्रजननक्षमतेवर नकारात्मक परिणाम होण्याची धारणा देखील आहे.” या अभ्यासातील तज्ज्ञांना असे आढळले की, लसीचा प्रजननक्षमतेवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडलेला नाही, म्हणजेच शुक्राणुजन्यतेचे प्रमाण कमी झाले नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group