हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेलं दिसत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 7 मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.
सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे – अजित पवार
अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
भंडारा – विजयकुमार गावित
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
बीड – धनंजय मुंडे
परभणी – संजय बनसोडे
नंदूरबार – अनिल भा. पाटील
दरम्यान, या सर्व नेत्यांकडे 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर पुण्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र अद्याप रायगड, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.