चीनला तांदळाची निर्यात; भाव वाढले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूचा उगम चीनमधून झाल्याने बहुतांश देशांनी चीनवर बहिष्काराची भूमिका घेतली होती. भारत-चीन सीमेवरील तणावामुळे उभय देशांचे संबंधही बिघडले होते. भारतातून चीनला तांदळाची निर्यात (R) झाल्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. कारण रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या तांदळाचे भाव गगनाला भिडल्यामुळे खिशाला कात्री बसणार आहे. (Rice prices increase)

चीनने तांदूळ खरेदी केल्यामुळे देशांतर्गत तांदळाचे भाव वाढले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तांदळाचे दर गगनाला भिडले आहेत. तांदळाच्या किमतीत क्विंटलमागे तब्बल 500 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच किलोमागे पाच ते सात रुपयांनी दरात वाढ झाली आहे. साहजिकच याचा थेट परिणाम तांदळाच्या किमती आणि सर्वसामान्य ग्राहकांवर

साठेबाज व्यापाऱ्यांनी चीनला तांदूळ पाठवला. परिणामी देशांतर्गत तांदळाची आवक घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये तांदळाचा भाव प्रति क्विंटल 2500 ते 4000 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. तर सोलापूरमध्ये 2400 ते 4000 हजार रुपयांच्या दरम्यान क्विंटलचे भाव आहेत.

भाज्या स्वस्त, डाळी महाग
सध्या थंडीची लाट पसरल्यामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. भाज्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. बाजार समितीत दोन महिन्यांपूर्वी कोथिंबीरीने तब्बल 80 रुपये प्रति जुडी असा उच्चांक गाठला होता. मात्र नोव्हेंबर अखेरीस भाज्यांचे दर उतरले. काकडी, टॉमेटो, गवार, हिरवा वाटाणा, कारली, कोबी, फ्लॉवर अशा हिरव्या भाज्यांच्या किमती स्वस्त झाल्या आहेत. तर रोजच्या जेवणातील डाळी महागल्याने सर्वसामान्य कात्रीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment