हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Accident) याच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला. पहाटे 5:30 वाजता हा अपघात झाला असून यामध्ये पंतच्या गाडीला आग लागून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. पंतच्या गाडीचा अपघात नेमका कसा झाला हे आता समजलं आहे. त्याबाबतचे CCTV फुटेज समोर आले आहेत. व्हिडिओ पाहताच तुमच्या अंगावर थरकाप आल्याशिवाय राहणार नाही.
Rishabh Pant च्या अपघाताचे CCTV फुटेज समोर; पहा थरकाप उडवणारा Video#Hellomaharashtra #Video pic.twitter.com/JUQ8Qux6ns
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 30, 2022
ऋषभची कार भरधाव वेगात- (Rishabh Pant Accident)
ऋषभ पंतच्या अपघातानंतर या घटनेशी संबंधित (Rishabh Pant Accident) अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर होत आहेत. मात्र, यादरम्यान पंतच्या कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेज मध्ये आपण पाहू शकता की, अपघातावेळी ऋषभची भरधाव वेगात होती. यावेळी कार लोखंडी पाईपच्या डिव्हायडरवर अत्यंत वेगाने आदळताना दिसत आहे. डिवायडरला धडकल्याने कार पलटी झाली आणि गाडीला आग लागली. कसाबसा ऋषभला गाडीतून बाहेर काढण्यात यश आलं.
A very much thank you to these guys who helped Rishabh pant this quickly 🙏#RishabhPant pic.twitter.com/2jEUxEk72b
— Rishabh pant fans club (@rishabpantclub) December 30, 2022
आज सकाळी पहाटे ५:३० वाजता हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ऋषभ पंतला नरसनपासून रुरकीच्या दिशेने सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सक्षम हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात दाखल करताना पंतची ऋषभ पंतची प्रकृती थोडी गंभीर होती, पण जसजसा वेळ निघून गेला तसतशी त्याची प्रकृती सुधारू लागली. ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यांनतर पंतची प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता असून इथून पुढे तो बराच काळ मैदानापासून दूर राहू शकतो.