रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट; Video पाहून म्हणाल क्या बात है!!

Rishabh Pant Helicopter Shot
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल (IPL 2024) मधील दिल्ली कपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (DC Vs GT) सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) धडाकेबाज कामगिरी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकात तर पंतने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर तब्बल ३१ धावा कुठल्या.. याच धावा नंतर महत्वपूर्ण ठरल्या आणि दिल्लीने ४ धावांनी निसटता विजय मिळवला. आपल्या या खेळीदरम्यान रिषभ पंतने महेंद्रसिंघ धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट मारत प्रेक्षकांना अचंबित केलं. सोशल मीडियावर पंतचा हा हेलिकॉप्टर शॉट चांगलाच चर्चेत आला आहे.

खरं तर प्रथम फलंदाजी करत असताना एकवेळ दिल्लीची अवस्था 3 बाद 44 अशी झाली होती. मात्र त्यानंतर रिषभ पंत आणि अक्षर पटेलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत गुजरातच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला केला. रिषभ पंतनं 88 धावांची तर अक्षर पटेलनं 66 धावा केल्या. नूर अहमद, रशीद खान, मोहित शर्मा या गोलंदाजांची दोन्ही फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. यावेळी मोहित शर्माने टाकलेल्या 16 व्या ओव्हरमध्ये रिषभ पंतनं महेंद्रसिंह धोनीचा ट्रेडमार्क शॉट असलेला हेलिकॉप्टर शॉट मारला आणि चाहत्यांना खुश केलं. पंतचा हा शॉट पाहून तुम्हालाही नक्कीच धोनीची आठवण येईल.

दरम्यान, गुजरात टायटन्स विरुद्ध ४३ चेंडूत ८८ धावांची वादळी खेळी केली. आपल्या खेळीत पंतने ५ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार ठोकले. डावाच्या २० व्या षटकात पंतने मोहित शर्माला चांगलाच चोप देत ३१ धावा कुठल्या. सामना संपल्यानंतर याच धावा दिल्लीसाठी निर्णायक ठरल्या आणि दिल्ली कपिटल्सने ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. दिल्लीचा संघ सध्या पॉईंट टेबल मध्ये ६ व्या क्रमांकावर आहे. दिल्लीने आत्तापर्यन्त एकूण ९ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना ४ सामन्यात विजय मिळाला आहे तर ५ सामन्यात पराभव पाहावा लागला आहे.