नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याची उत्तराखंड सरकारकडून आपल्या राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही जबाबदारी ऋषभ पंतवर (Rishabh Pant) सोपवली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः ट्विट करून पंत (Rishabh Pant) याची राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती दिली.
प्रदेश सरकार ने देवभूमि के सपूत एवं भारतीय क्रिकेट टीम के प्रतिभावान खिलाड़ी @RishabhPant17 जी को उत्तराखण्ड के युवाओं को खेलकूद एवं जन स्वास्थ्य के प्रति प्रोत्साहित किए जाने के उद्देश्य से "राज्य ब्रांड एम्बेसडर" नियुक्त करने का निर्णय लिया है।
आपको हार्दिक शुभकामनाएं ! pic.twitter.com/2NP1lZ5pga
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 10, 2022
काय म्हणाले पुष्कर सिंह धामी ?
‘उत्तराखंडमधील तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने देवभूमीचे सुपुत्र आणि भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची राज्य सरकारने “राज्य ब्रँड अॅम्बेसेडर” म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आपणास शुभेच्छा!’ असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
ऋषभ पंत कारकीर्द
ऋषभ पंत (Rishabh Pant) हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. तो हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथे वाढले आणि तेथेच त्यांचे शिक्षण झाले. तो दिल्लीतून रणजी खेळायचा. ऋषभ पंतने (Rishabh Pant) टीम इंडियासाठी 31 कसोटी, 27 वनडे आणि 54 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 2123, 840 आणि 883 धावा केल्या आहेत. या खेळाडूने वयाच्या 24 व्या वर्षी टीम इंडियाची कमानही सांभाळली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पंत हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर