रिषभ पंतला डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग?? भारतीय संघाला झटका

Rishabh Pant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रांनी याबाबत अधिक माहिती देत म्हंटल आहे की रिषभ पंत गेल्या 8 दिवसांपासून विलगीकरणात असून अस बोललं जातं आहे की पंतला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध साऊथॅम्प्टन येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला तीन आठवड्यांचा ब्रेक देण्यात आला. या दरम्यान टीम इंडियाचे खेळाडू ब्रिटनमधील बर्‍याच वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्या दिवसांत, युरो चषक इंग्लंडमध्ये खेळला जात होता, ज्यासाठी पंत देखील सामना पहायला गेला होता. तिथेच त्याला कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान, ऋषभ पंतला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्याजागी संघात कोणाला स्थान मिळणार याबाबत संघ व्यवस्थापन अभ्यास करत आहे. दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंमध्ये वृद्धीमन साहा आणि लोकेश राहुल हे दोघेही यष्टीरक्षक फलंदाज असल्याने पंतच्या जागी या दोघांतील एकाला संघात स्थान मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.