डोमिनिका कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर मेहुल चोकसी अँटिगा आणि बार्बुडा मध्ये दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डोमिनिकामध्ये जामीन मिळाल्यानंतर फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी (Mehul Choksi) अँटिगा आणि बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे. डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेशाच्या आरोपाखाली त्याला तेथे 51 दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले. भारतातून फरार झाल्यानंतर, चोक्सी 2018 पासून अँटिगा आणि बार्बुडा येथे वास्तव्यास आहेत, त्याने तेथे नागरिकत्वही घेतले आहे. चोक्सीवर डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप आहे, तर त्याच्या वकिलांनी असा दावा केला आहे की, त्याचे अपहरण करण्याचा हा कट होता. डोमिनिका हायकोर्टाने चोकसी (62) यांना त्याच्या उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे.

ईस्टर्न कॅरेबियन दहा हजार डॉलर्स (अंदाजे तीन लाख रुपये) दिल्यानंतर कोर्टाने चोक्सीला अँटिगा येथे जाण्यास परवानगी दिली. जामीन मिळावा यासाठी चोकसीने आपला वैद्यकीय अहवालही न्यायालयात सादर केला होता, ज्यात ‘सीटी स्कॅन’चा समावेश होता. या अहवालात त्याच्या ‘हेमेटोमा’ (मेंदूशी संबंधित आजार) खराब होण्याची चर्चा होती.

डॉक्टरांनी ‘न्यूरोलॉजिस्ट’ आणि ‘न्यूरोसर्जिकल’ सल्लागाराद्वारे चॉक्सीच्या वैद्यकीय स्थितीचा त्वरित आढावा घेण्याचा सल्ला दिला होता. 29 जून रोजी झालेल्या ‘सीटी स्कॅन’ अहवालावर डोमिनिकाच्या प्रिन्सेस मार्गारेट हॉस्पिटलमधील येरांडी गॅले गुटेरेझ आणि रेने गिलबर्ट व्हॅरिनेस यांच्या स्वाक्षऱ्यांनी या अहवालात म्हटले आहे की, “या उपचार सुविधा सध्या डोमिनिकामध्ये उपलब्ध नाहीत.”

विशेष म्हणजे, पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील हिरे व्यापारी मेहुल चोकसी हा 23 मे रोजी अँटिगा आणि बार्बुडा येथून संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाला होता. नंतर त्याला बेकायदेशीरपणे डोमिनिका शेजारच्या देशात प्रवेश केल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला 23 मे रोजी अँटिगाच्या जोली हार्बर येथून काही पोलिसांनी पळवून नेले असा आरोप चोक्सीच्या वकिलांनी केला आहे. हे पोलिस अँटिगा आणि भारताचे नागरिक असल्याचे दिसून आले, ज्याने त्याला डोमिनिकामध्ये फेरीमध्ये नेले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment