हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा सीझन आजपासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होत आहे. देशातील चार शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्समध्ये होणार आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहे तर दुसरीकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजांची कमान सांभाळेल. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत.
सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त इंडिया लिजेंड्समध्ये इरफान पठाण, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांसारखे खेळाडू आहेत, तर जॉन्टी रोड्सच्या संघात लान्स क्लुसनर, जोहान बोथा आणि व्हर्नन फिलँडरसारखे प्रतिभावान खेळाडू आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लीजेंड्स संघाची फलंदाजी मजबूत आहे. ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनानेही भारतीय संघात सामील झाल्याने भारताची ताकद नक्कीच वाढली आहे, अलीकडेच रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच युवराज सिंग आणि युसूफ पठाण सारखे स्फोटक फलंदाज असल्याने आफ्रिकेच्या बॉलर पुढे मोठं आव्हान असणार आहे. तर बॉलिंग लाइनअपमध्ये इरफान पठाण, हरभजन सिंग, अभिमन्यू मिथुन आणि प्रज्ञान ओझा यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.
दुसरीकडे, गेल्या मोसमात दक्षिण आफ्रिका दिग्गजांना उपांत्य फेरीत श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. या मोसमात मात्र त्यांनी जॉन्टी ऱ्होड्सला कर्णधारपदी ठेवून आपल्या संघात अनेक बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिका दिग्गज संघात व्हर्नन फिलँडर आणि लान्स क्लुसनर सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या फलंदाजीत हेन्री डेव्हिड आणि अल्विरो पीटरसन यांचा समावेश आहे. गोलंदाजीचे नेतृत्व स्टार वेगवान गोलंदाज मखाया एनटिनी आणि जोहान बोथा यांच्याकडे आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या दुसऱ्या सीजन मध्ये १० सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत कानपूरमध्ये सामने होणार आहेत. यानंतर 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत इंदूरमध्ये आणि 21 ते 25 सप्टेंबरदरम्यान डेहराडूनमध्ये सहा सामने खेळवले जातील. रायपूर, छत्तीसगड येथे अंतिम आणि उपांत्य फेरीसह एकूण पाच सामने खेळवले जातील.
दोन्ही संघाचे संभाव्य 11 खेळाडू-
इंडिया लीजेंड्स: सचिन तेंदुलकर (कप्तान), एस बद्रीनाथ, नमन ओझा, सुरेश रैना, युवराज सिंह, यूसुफ पठान, इरफान पठान, प्रज्ञान ओझा, अभिमन्यु मिथुन, विनय कुमार और राहुल शर्मा.
साउथ अफ्रीका लीजेंड्स– एल्विरो पीटरसन, हेनरी डेविड्स, मोर्ने वैन विक (विकेटकीपर), जैक्स रूडोल्फ, जॉन्टी रोड्स (कप्तान), लांस क्लूजनर, जोहान बोथा, वर्नोन फिलेंडर, जोहान वैन डेर वाथ, गार्नेट क्रूगर और मखाया एनटिनी.
इंडिया लिजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स सामना किती वाजता सुरू होईल?
इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
कोणते चॅनल इंडिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स सामना प्रसारित करेल?
इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका रोड सेफ्टी मालिका सामना भारतात स्पोर्ट्स 18, कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट वर प्रसारित केला जाईल.