Monday, February 6, 2023

औरंगाबादेतील रस्त्यांचे डांबरीकरण; 39 रस्ते होणार चकाचक

- Advertisement -

औरंगाबाद | शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याची खराब अवस्था आहे. अशा रस्त्याचे आता डांबरीकरण होणार आहे. राज्य सरकारच्या 277 कोटीच्या निधीतून 58 मुख्य रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ मानपाच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेल्या शंभर कोटिपैकी 57 कोटीच्या निधीतून 31 किमी अंतर असलेल्या 39 रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे.

त्याकरिता अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करण्यात आला असून मनपा प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. व्हाईट टॅपिंगसाठी होणारा परिणाम लक्षात घेऊन मनपा प्रशासकांनी पहिल्या टप्प्यात 40 रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रस्त्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश शहर अभियंता यांना दिले.

- Advertisement -

शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाभियंता बी.पी फड व त्यांच्या सहकार्यांनी 40 रस्त्यांची निवड करून त्याकरिता लागणाऱ्या 57 कोटी 10 लाख 14 हजार 15 रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्याकरिता सहा भागामध्ये रस्त्याची यादी तयार करण्यात आली आहे.