RJD Vs JDU : बिहारमध्ये राजकीय भूकंप?? लालूंच्या मुलीच्या ‘त्या’ 3 ट्विटची देशभर चर्चा

Rohini Acharya Tweet
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि आम आदमी (AAP) पक्षाने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्याने इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. त्यातच आता बिहारमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) पुन्हा भाजपसोबत जुळवून घेणार असल्याच्या बातम्या पसरत असतानाच आता लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी एकामागून एक केलेल्या ३ ट्विटमुळे बिहारमध्ये मोठं काही तरी घडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

रोहिणी आचार्य या सिंगापूर येथे राहत आहेत मात्र अनेकदा त्यांनी आपल्या कुटुंबाची बाजू आक्रमकपणे मांडली आहे. एकीकडे बिहारमध्ये राजकीय उलथापालथीच्या बातम्या चर्चेत असताना रोहिणी आचार्य यांनी ट्विटर वर पोस्ट करत (Rohini Acharya Tweet) आपलं लक्ष्य वेधलं आहे. रोहिणी आचार्य आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, समाजवादी असल्याचा दावा करणारे हवा बदलते तसे विचारधारा बदलतात. जेव्हा स्वतःची वर्तुवणूक चांगली नसेल तर वाईट वाटून उपयोग नसतो. नशीबात असलेल्या गोष्टी कोणी टाळू शकत नाही. तसेच आपल्या तीसऱ्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या कि, बऱ्याचदा लोकांना आपले दोष दिसून येत नाहीत, मात्र दुसऱ्यांवर हे बेशरम लोक आरोप करत राहतात. रोहिणी आचार्य यांनी या पोस्टच्या माध्यमातून नाव न घेता नीतीश कुमार यांच्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

नितीशकुमार यांनी जाहीर केली नाराजी –

रोहिणी आचार्य यांच्या ट्विटनंतर नितीशकुमार चांगलेच संतापल्याचे वृत्त आहे. बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीतच नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्याजवळ ही नाराजी व्यक्त सुद्धा केली. एवढच नव्हे तर संतापलेल्या नितीशकुमार हे बैठकीतून तडकाफडकी निघून पण गेले. या एकूण संपूर्ण प्रकारानंतर नितीशकुमार येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.