मुंबई लोकल वरून रोहित पवारांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर साधला निशाणा ; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई लोकल वरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. रोहित पवार यांनी मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या मुद्द्यावरुन थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी लोकल सुरु करण्यासंदर्भात पियुष गोयल यांना श्रमिक रेल्वेबाबत त्यांनी केलेल्या ट्विटची आठवण करुन देताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वे मंत्री पियुष गोयल हे लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात, अशी खोचक टीका भाजपवर केली आहे. एवढंच नाही तर रोहित पवार यांनी मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना श्रमिक रेल्वेबाबत त्यांनी केलेल्या ट्वीटची आठवण करुन दिली.

सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले होते. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती

लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठिण होणार आहे. त्याशिवाय लोकल सुरू केल्यास रेल्वे फलाटावर होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्राला देत रेड सिग्नल दाखवला आहे.

दरम्यान, गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेली मुंबई लोकल सेवा सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्रही पाठवण्यात आले आहे. पण, ‘रेल्वे विभाग या कामात खोडा घालत आहे’, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment