Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची ED चौकशी पुन्हा होणार; या तारखेला पुन्हा बोलावलं

Rohit Pawar ED Enquiry 1 feb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची काल तब्बल १२ तास ED कडून चौकशी करण्यात आली. यावेळी ईडी अधिकार्यांनी रोहित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. रात्री साडे दहाच्या सुमारास ते ईडी कार्यालयाच्या बाहेर पडले. रोहित पवारांची चौकशी इथेच थांबलेली नाही. ईडीने त्यांना १ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे.

काल रात्री उशिरा रोहित पवार चौकशी संपल्यावर (Rohit Pawar ED Enquiry) ईडी कार्यालयाच्या बाहेर पडले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. इतकंच नाहीतर रोहित पवारांना खांद्यावर उचलून घेतलं. यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा लढा मोठा असून आपण सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहेत असं रोहित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. बारामती अॅग्रोशी संबंधित असलेल्या कन्नड एसएसके मिल, हायटेक इंजिनीरिंग कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आणि समृद्धी साखर प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून रोहित पवार यांची चौकशी करण्यात आल्याचे बोललं जात आहे .

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?? Rohit Pawar ED Enquiry

आज १२ तास चौकशी झाली असली तरी पुन्हा एकदा मला 1 तारखेला आणखी माहिती द्यायला बोलावलं आहे.खरं तर मी व्यवसायामध्ये आधी आलो मग राजकारणात आलो. प्रामाणिकपणे व्यवसाय केला. काही लोक आधी राजकारणात आले आणि नंतर सहजपणे व्यवसाय केला. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही. त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा असा माझा त्यांना प्रश्न असल्याचं रोहित पवार म्हणाले. तरीही महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर कधी झुकत नाही आणि झुकणार सुद्धा नाही. आपली लढाई सुरुच राहणार आहे असं म्हणत रोहित पवारांनी सर्व समर्थकांचे आभार मानले.