10.2 C
New York
Monday, January 6, 2025

11 एप्रिल ला होणाऱ्या MPSC परीक्षेबाबत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाचा कहर वाढतोच आहे. त्यामुळे कोरोनाची चेन तोडण्यासाठी ब्रेक द चेन याअंतर्गत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. तर शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. हे सर्व नियम 30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र या लोकडाऊन मुळे एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र पेच निर्माण झाला आहे. ही परीक्षा येत्या 11 एप्रिल रोजी आहे. यावरूनच आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे एक विनंती केली आहे. त्याबाबतचे ट्विट त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केले आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ” लॉक डाउन असताना रविवारी (11एप्रिल )होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यावी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत तसेच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा ही विनंती”. अशा आशयाचे ट्विट करत रोहित पवार यांनी राज्य शासनाला एमपीएससी देणाऱ्या परीक्षार्थींच्या बाबत विचार करण्यास विनंती केली आहे. यावर आता राज्य शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान रोहित पवारांच्या या ट्वीट वर बऱ्याच युवकांनी कमेंट करत आपली मते नोंदवली आहेत. यात अनेक जणांनी अकरा तारखेला घेण्यात येणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे.

परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह

“आज जर इतकी भयानक अवस्था असेल, अन् पेपर झाल्यावर मुले त्यांच्या गावी जातील व प्रत्येक ग्रामीण भागात कोरोना पोहचेल , हा ‘कोरोना सायलंट बॉम्ब ‘ठरेल महाराष्ट्र साठी,
MPSC ने परीक्षा काही काळ पुढे ढकलावी म्हणजे जे मुले positive आहेत ते लगेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतील ” अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ शिंदे या तरुणाने दिली आहे.