अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. कर्जतचे पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्या पीए ने राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राम शिंदेंना मोठा धक्का बसलाय.
पवार हे कर्जत विधानसनभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवत आहेत. त्याअनुषंगाने पवार यांनी मतदार संघात जोरदार फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. सोमवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्धार मेळाव्यात भाजपच्या अनेक पदाधिकारर्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं शिंदे यांना मोठा धक्का बसलाय.
पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे व पालकमंत्री राम शिंदे यांचे पीए अशोक धेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी जाहीर प्रवेश केला. तसेच पंं.स. उपसभापती राजश्री मोरे, अशोक धेंडे, अहल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे, देवदैठणचे सरपंच अनिल भोरे, भाजप किसान सेलचे अध्यक्ष संतोष कात्रजकर, कुसडगावचे ग्रामपंचायत सदस्य राम गंभिरे, भाजप वारकरी सेलचे तालुकाध्यक्ष अमृत महाराज डुचे यांचा समावेश आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाच्या बातम्या –
कर्जत जामखेड : हा व्यक्ती अपक्ष उभारल्यास रोहित पवार निवडणूक जिंकण्याची शक्यता
रोहित पवारांशी खुली चर्चा करण्यास मी तयार आहे – राम शिंदे
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!
राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल
चा मास्टरस्ट्रोक, राम शिंदेंच्या पीए सह ‘या’ भाजप नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार