अहमदनगर प्रतिनिधी | जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे लोकायुक्तांच्या नेमणुकीची मागणी करत बेमुदत उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेलेले नसून आण्णांचे आरोग्य ढासळत आहे. यापार्श्वभूमीवर अनेक दिग्गज राजकीय नेते आण्णांच्या भेटीला राळेगन्सिद्धी येथे येऊन हजारे यांना आपला पाठींबा दर्शवत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांची आज भेट घेतली.
रोहित पवार हे सध्या पक्ष संघटनेत चांगलेच सक्रीय झाल्याचं दिसत आहे. अण्णांचे उपोषण हे सर्वसामान्यांसाठी आहे. लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ते उपोषणाला बसले आहेत. अण्णांच्या मागण्या मान्य केल्याचे सरकार सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नसून सरकार अण्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
यावेळी पवार यांनी अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करत आण्णांना आपला पूर्ण पाठींबा असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारने अद्यापही अण्णांच्या मागण्यांवर तोडगा काढलेला नाही .लोकपाल आणि लोकायुक्तांच्या त्वरीत नियुक्तीसाठी अण्णा आंदोलनावर ठाम आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?
शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?