मुंबई प्रतिनिधी | येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांनी गृहखात्याचे प्रधान सचिव यांच्या पत्राच्या आधारे लोणावळा ते पाचगणी प्रवास केल्याचे समोर आले. यानंतर विरोधीपक्षाने यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना पत्र देणार्या प्रधान सचिव गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांनी सरकारवर टिका करणे सुरु ठेवले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
यावेळी, ‘आज सर्वजण रात्रंदिवस काम करतायेत. एखाद्या अधिकाऱ्याने व्यक्तिगत पत्र देऊन चूक केली तर महाविकास आघाडीमार्फत कोणतीही क्लिनचिट न देता, निरमा पावडरने चुका धुवून न काढता संबंधितांवर कारवाई होते. तरिही याचा दोष संपूर्ण यंत्रणेला देण्याचा प्रयत्न केला जातो आहे’ असं मत पवार यांनी व्यक्त केले आहे. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या यंत्रणेचं आपण मानसिक खच्चीकरण करू पहात आहोत. राजकारण करणारे विरोधक नेहमीच राजकिय भांडवल करू पाहतील, पण ही वेळ एक होण्याची आहे असं म्हणत पवार यांनी विरोधकांना कोरोना व्हायरस विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.
आज सर्वजण रात्रंदिवस काम करतायेत. एखाद्या अधिकाऱ्याने व्यक्तिगत पत्र देऊन चूक केली तर महाविकास आघाडीमार्फत कोणतीही क्लिनचिट न देता/निरमा पावडरने चुका धुवून न काढता संबंधितांवर कारवाई होते.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 10, 2020
तरिही याचा दोष संपूर्ण यंत्रणेला देण्याचा प्रयत्न केला जातो.
दरम्यान, आज विरोधी पक्ष करत असलेली टिका पाहून दिवे लावून देखील यांच्यात काही फरक पडणार नाही असं वाटत असल्याचंही पवार यांनी म्हटले आहे. वाधवान कुटुबियांचे पवार कुटुंबियांशी सौख्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाधवान कुटुंबियांना पत्र देण्यामागे पवारांचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
भिलवाडा पॅटर्नच्या पाठीमागे 'या' तरुण महिला IAS अधिकाऱ्याचे डोके! जाणून घ्या काय आहे 'हा' पॅटर्न
— Careernama (@careernama_com) April 10, 2020
@tinadabikhan या २०१५ च्या यु.पी.एस.सी. टाॅपर राहिल्या आहेत#BhilwaraModel #TinaDabi #Careernama #Career #Job #UPSC https://t.co/d9P8wbbHrx
रशियाची ग्लॅमरस टेनिसपटू शारापोव्हाने लॉकडाउनला कंटाळून शेअर केला थेट फोन नंबर@MariaSharapova #CoronavirusOutbreakindia #LockdownExtended #HelloMaharashtrahttps://t.co/gdlCkOPRbF
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020