राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेते राज ठाकरेंकडून राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. राज ठाकरेंच्या टीकेतून अनेक अर्थ निघत आहेत. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ट्विट करीत त्यामागचा अर्थही सांगितला आहे. “विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय !” असे पवारांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दोन ट्विट करून राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो”.

आमदार रोहित पवारांनी दुसऱ्या केलेल्या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ समजून सांगितलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय !” असे दोन ट्विट पवारांनी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here