हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत याना जामीन मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी शेअर केलेला वाघाचा व्हिडिओ जोरदार चर्चेत आला.
राऊतांना झालेली अटक बेकायदशीर; कोर्टाची ED ला चपराक
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/GPbSw1qAPr#hellomaharashtra @rautsanjay61 @ShivSena
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 9, 2022
मुंबई कोर्टाने संजय राऊत याना जामीन मंजूर करताच रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून वाघाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा वाघ पिंजऱ्यातून बाहेर येताना दिसत आहे. यावेळी रोहित पवारांनी सत्यमवे जयते असं म्हणत संजय राऊत आणि शिवसेनेला टॅग केलं आहे.
#सत्यमेवजयते!@rautsanjay61@ShivSena@ShivsenaComms pic.twitter.com/MBnD5gnWsl
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 9, 2022
दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची राऊतांच्या जामिनावर प्रतिक्रिया देत न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. आता आमची तोफ आता पुन्हा रणांगणात आली आहे. राऊत साहेब हे निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच शिवाय ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत असं त्यांनी म्हंटल. राऊत यांच्यावरही दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र, ते पळून गेले नाहीत, त्यांनी गद्दारी केली नाही हे लोकांसमोर आलेले आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटल आहे.