फडणवीस साहेब तुम्ही चुकून PM ऐवजी CM म्हणालात…; रोहित पवारांनी काढला चिमटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. यावेळी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचे म्हटलं होतं. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेतला. ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ असं म्हणत असताना फडणवीस साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात…असं सांगत GST थकबाकीवरून चिमटा काढला.

रोहित पवार ट्विटवर म्हणाले कि, ”राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला’ असं म्हणताना देवेंद्र फडणवीस साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात. कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय. पण आता येत्या #GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा.”

नेमकं काय म्हणाले होते फडणवीस
महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक काल पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रादेशिक भेदभावाचा आरोप केला. शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण कोकणाला या सरकारने काय दिलं? विदर्भाला फक्त 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे? पिकेल ते विकेल काय करता? मागच्या वर्षी पिकलं ते खरेदी केलं नाही आणि काय वल्गना करता? आम्ही सत्तेत असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरत होते ते आता कुठे गायब झालेत? लबाडी काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसकडून शिकावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”