हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी फूट पाडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षबांधणीसाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. शरद पवार शुक्रवारपासून दोन दिवसांच्या सातारा व कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी कराड इथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि संजय शिरसाट व अजित पवारांवर हललाबोल केला. संजय शिरसाट स्वतः प्रवक्ते असल्यामुळं त्यांच्या पोटात कुठंतरी दुखतंय. त्यांना मंत्री व्हायचं आहे, ते स्वतः बोललेले आहेत. आम्ही कुठेही पदासाठी, मंत्रीपदासाठी लाचार झालेलो नाही, आम्ही नियत कुठे विकलेली नाही. तेव्हा तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.
रोहित पवार यांनी कराड (Karad) येथे काहीकाळ थांबून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक सौरभ पाटील, समीर कुडची, संजय पिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रोहित पवार म्हणाले की, आम्ही पदांसाठी कोठेही भेदभाव करत नाही. परंतु मला पद नको, विचार महत्त्वाचा आहे. सध्याचे सरकार मुद्दामहून खासगी कंपन्यांकडून भरती करत आहे. पेपर अनेक वेळा फुटलेले आहेत. त्यामध्ये एफआयआर दाखल होवूनही सरकार उलट पेपर कुठे फुटला आहे असे म्हणत असेल, तर कुठेतरी चुकीचं घडतंय आणि त्याची पाठराखण सरकार करतंय. पुढच्या काही दिवसांत यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीत जो काही काळाबाजार चालला आहे. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला.
पवार कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळाल्यानंतर अध्यक्ष व्हायचं असतं तर… : रोहित पवार
पवार कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळाल्यानंतर अध्यक्ष व्हायचं असतं तर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो असतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये मी मंत्री होऊ शकलो असतो. पण, मी झालो का? मला मंत्री कुठे व्हायचं असतं, पदासाठी मी लढत असतो तर मी आज सत्तेच्या बाजूला असतो. आम्ही पदांसाठी कोठेही भेदभाव करत नाही. परंतु मला पद नको, विचार महत्त्वाचा आहे. संजय शिरसाट स्वतः प्रवक्ते असल्यामुळं त्यांच्या पोटात कुठंतरी दुखतंय. त्यांना मंत्री व्हायचं आहे, ते स्वतः बोललेले आहेत. आम्ही कुठेही पदासाठी, मंत्रीपदासाठी लाचार झालेलो नाही, आम्ही नियत कुठे विकलेली नाही. तेव्हा तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका, असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला.