महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी…; रोहित पवारांचे ट्विट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत आहे. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या मोदी भेटीबाबतच्या ट्विटचा दाखला देत महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी अनिल अग्रवाल साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे अस रोहित पवारांनी म्हंटल.

रोहित पवार यांचा अप्रत्यक्ष रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी अनिल अग्रवाल साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरातच्या निवडणुका बघता पंतप्रधान साहेबांचं प्राधान्य नेहमीप्रमाणे गुजरात असेल यात काही शंका नाही, पण त्यासाठी दरवेळेस महाराष्ट्राच्या युवकांचा एवढा मोठा बळी का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

याप्रकरणी महाराष्ट्राचे नेते कमी पडले किंवा चुकले हे कोणीही नाकारू शकत नाही. IFSC बाबतही असंच घडलं होतं. किमान आता तरी गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. महाराष्ट्रातील युवा रोजगाराकडं डोळे लावून बसले असताना एवढी उदारता आपल्याला परवडणारी नाही अस रोहित पवार यांनी म्हंटल.