हिटमॅन रोहित शर्मा ठरला यंदाचा आयसीसी ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इअर २०१९’चा मानकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । आयसीसीकडून विशेष कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारताचा सलामीवीर आणि हिटमॅन रोहित शर्मा याची आयसीसी ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इअर २०१९’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली याची ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

रोहित शर्मासाठी २०१९ हे वर्ष शानदार ठरले होते. गेल्या वर्षी रोहितने वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये १० शतक झळकावली होती. यापैकी ५ शतक ही इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत केली होती.रोहितने गेल्या वर्षी २८ सामन्यात १ हजार ४९० धावा केल्या. यापैकी ६४८ धावा इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपमधील ६ सामन्यात केल्या होत्या.

तर विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट हा पुरस्कार देण्यात आला. वर्ल्ड कपमधील एका सामन्यात स्टिव्ह स्मिथचे कौतुक करताना विराटने टाळी वाजवली होती. विराट फलंदाजी करत असताना सीमा रेषेवर फिल्डिंग करणाऱ्या स्मिथला प्रेक्षक चिडवत होते. प्रेक्षकांचे हे वर्तन विराटला आवडले नाही. त्याने हाताने इशारा करत नाराजी व्यक्त केली आणि स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली वगळता दीपक चहरला टी-२०मधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार देण्यात जाहीर झाला. दीपकने नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात ७ धावा देत ६ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात दीपकने हॅटट्रिक घेतली होती. टी-२०मध्ये भारताकडून हॅटट्रिक करणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता.