देशांतर्गत क्रिकेटबाबत कर्णधार रोहितचं मोठं विधान; खेळाडूंना नेमका काय संदेश दिला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्याने बीसीसीआयने (BCCI) ईशान किशन आणि श्रेयश अय्यर याना काँट्रॅक मधून बाहेरचा रस्ता दाखवला. बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे नवा वाद उफाळून आला. यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सुद्धा यावर आपलं मत व्यक्त करत म्हंटल कि देशांतर्गत क्रिकेटला महत्व द्यायला हवे आणि खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवं.

उद्यापासून धर्मशाळा येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना सुरु होणार आहे. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहितने विविध प्रश्नावर आपलं मत व्यक्त केलं. जर कोणताही खेळाडू जखमी नसेल आणि फिट असेल तर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे. मी मुंबई विरुद्ध तामिळनाडू रणजी सामना पाहिला आहे. देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देणे गरजेचे आहे असं म्हणत रोहित शर्माने ईशान किशन आणि श्रेयश अय्यर यांच्यावर एकप्रकारे निशाणा साधला.

यावेळी त्याने इंग्लंडच्या बेन डकेटलाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इंग्लंड विरुद्धच्या सिरीज मध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आक्रमक फलंदाजी करत आहे. मात्र ज्याप्रकारे तो आक्रमक क्रिकेट खेळत आहे त्याचे श्रेय इंग्लंडला दिले पाहिजे असं बेन डकेटने म्हंटल होते. त्यावर उत्तर देताना रोहितने म्हंटल, भारतीय संघात ऋषभ पंत नावाचा खेळाडू होता, कदाचित बेन डकेटने त्याला खेळताना पाहिले नसेल. म्हणजेच रोहितला असं सांगायचं होते कि इंग्लडच्या खेळाडूंच्या फार पूर्वीच ऋषभ पंत आक्रमक खेळत होता.