हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देशातील लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. देश-विदेशात रोहितचे करोडो चाहते आहेत. रोहितची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी अनेकजण तर टीव्हीसमोरून हलत सुद्धा नाहीत. मात्र सध्या रोहित शर्माचे वय ३७ वर्ष असल्याने त्यांच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा अधून मधून होत असतात. मात्र खुद्द रोहित शर्मानेच निवृत्तीच्या प्रश्नावर थेट उत्तर देत सर्व चर्चाना उत्तर दिले आहे. आपल्या डोक्यात निवृत्तीचा कोणताही विचार नसून मला वर्ल्डकप जिंकायचा आहे असं रोहितने म्हंटल. त्याच्या या विधानाने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल.
मला विश्वचषक जिंकायचा आहे -Rohit Sharma
ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सच्या विशेष आवृत्तीत एड शीरन आणि गौरव कपूर यांच्याशी बोलत असताना रोहित म्हणाला, मी खरोखर निवृत्तीचा विचार केलेला नाही. पण, आयुष्य तुम्हाला कुठे घेऊन जाते हे आपल्याला माहीत नाही. परंतु या क्षणी मी अजूनही चांगला खेळत आहे . मला वाटते की मी आणखी काही वर्षे खेळू शकतो. मला विश्वचषक जिंकायचा आहे आणि 2025 मध्ये WTC फायनल आहे, मला आशा आहे की भारत WTC जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असं रोहित शर्माने सांगितले.
यावेळी रोहित शर्माने २०२३ मधील ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवावरही भाष्य केलं. विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये भारत खराब क्रिकेट खेळला असे समजू नका असं तो म्हणाला. अंतिम सामन्यापर्यंत भारताला कोणी हरवेल असं वाटलं नव्हतं. मात्र तो दिवसच भारतीय संघाला चांगला गेला आणि ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा थोडा चांगला खेळला. परंतु अंतिम सामन्यात आपल्या संघाने वाईट क्रिकेट खेळले नाही असे मत रोहितने व्यक्त केलं. 50 षटकांचा विश्वचषक हा माझ्यासाठी खरा विश्वचषक आहे. आम्ही 50 षटकांचा विश्वचषक पाहत मोठे झालो आहोत. त्यातच २०२३ वर्ल्डकप हा भारत आपल्या प्रेक्षकांसमोर होत असल्याने उत्साह होता. फायनलपर्यंत आम्ही खूप चांगले खेळलो, मात्र अंतिम फेरीत आपला पराभव झाला असं रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितलं.