हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड कडून तब्बल 10 गडी राखून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. भारताच्या पराभवानंतर रोहितला अश्रू अनावर झाले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सामना संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड संघासोबत हस्तांदोलन केलं. त्यानंतर भारतीय संघ डगआऊटमध्ये पोहोचला, तेव्हा रोहित शर्मा भावूक झाला. बराच वेळ रोहित शर्मा राहुल द्रविडसोबत बोलताना दिसत होता. दोघे काही वेळ बोलले आणि त्यानंतर रोहित शर्मा भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. यावेळी राहुल द्रविड यांनी त्याला सावरले.
.@ImRo45 🥹😭https://t.co/H8WSMsK7MS
— 47thcenturywhenRohit (@RohitCharan_45) November 10, 2022
दरम्यान, आजच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 63 धावा केल्या तर विराट कोहलीने 50 धावा बनवल्या. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची अपयशाची मालिका या सामन्यातही कायम राहिली. त्याचा फटका भारतीय संघाला बसला.
169 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवाती पासूनच आक्रमक पवित्रा घेत भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. बटलरने अवघ्या 49 चेंडूत 80 धावा केल्या तर दुसरीकडे अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत 86 धावा कुठल्या. भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. या पराभवामुळे भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. आता फायनल मध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानसोबत होईल.