राहुल द्रविडबद्दल बोलताना रोहित शर्मा भावुक; म्हणाला मी खूप प्रयत्न केले, पण …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मावळता प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) बद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भावुक झाला. मुख्य प्रशिक्षक म्हणून तुम्ही कायम राहा अशी विनंती मी राहुल सरांना केली मात्र त्यांचं मत बदलण्यात मी यशस्वी झालो नाही असं रोहित शर्मा म्हणाला. आज आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने भारतीय संघाची वर्ल्डकप मोहीम (T20 World Cup 2024) सुरु होत आहे. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा राहुल द्रविड बद्दल भरभरून बोलला.

रोहित शर्मा म्हणाला, राहुल द्रविड याना प्रशिक्षकपदावर राहण्यासाठी मी खूप समजवले परंतु ते तयार झाले नाहीत. खरं तर जेव्हा मी २००६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं त्यावेळी राहुल द्रविड हाच माझा पहिला कर्णधार होता, एवढच नव्हे तर जेव्हा मी भारताच्या कसोटी संघात सामील झालो तेव्हाही मी राहुल द्रविड याना अगदी जवळून खेळताना बघितलं होते. राहुल द्रविड यांचा खेळ बघत बघतच आम्ही लहानाचे मोठे झालोय. एक खेळाडू म्हणून त्याने जे काय मिळवले, भारतीय संघासाठी किती मोठे योगदान दिले ते आपल्या सर्वाना माहित आहे. राहुल द्रविड एक आदर्श खेळाडू आहे.

दरम्यान, द्रविडने सोमवारी स्पष्ट केलं होते कि भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ मागणार नाही, त्यामुळे बीसीसीआय आता नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर आणि भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर नव्या प्रशिक्षकाच्या शैर्यतीत आघाडीवर आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गंभीरसोबत याबाबत चर्चा सुद्धा केली असून त्याची निवड फिक्स मानली जात आहे. मात्र, गंभीरने या पदासाठी अर्ज केला आहे की नाही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. बीसीसीआयनेही गंभीरच्या अर्जावर काहीही माहिती अजून तरी दिलेली नाही.