हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 वर्ल्डकपपूर्वीच (T20 World Cup 2024) भारताला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाठदुखीने त्रस्त आहे. कालच्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबईच्या प्लेयिंग इलेव्हन मध्ये समावेश नव्हता, तो इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात खेळला. याचे कारण सांगताना फिरकीपटू पियुष चावलाने रोहितच्या दुखापतीबाबत (Rohit Sharma Injury) अपडेट दिले. रोहित शर्माच्या पाठीत थोडे दुखत होते, त्यामुळे व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मैदानात उतरवले नाही अशी माहिती चावलाने दिली.
पाठदुखीच्या त्रासाने पुन्हा एकदा डोकं वर- (Rohit Sharma Injury)
रोहित शर्माच्या पाठदुखीच्या त्रासाने (Rohit Sharma Injury) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या सहभागावरुन चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार असून T20 वर्ल्डकपमध्ये त्यांच्यावर संपूर्ण भारतीय संघाची भिस्त आहे. रोहित शर्मा गेल्या काही महिन्यापासून सतत क्रिकेट खेळत आहे. त्याच्यावर कामाचा ज्यादा वर्क लोड आहे. अशा परिस्थितीत वर्ल्डकप पूर्वी आणखी काही दुखापत होऊ नये हि खबरदारी घेऊन रोहित काल इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात खेळला.
दरम्यान, T20 वर्ल्डकपसाठी भारताच्या संघाची निवड झाली आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. २००७ चा पहिला वर्ल्डकप भारताने जिंकला होता, त्यानंतर मात्र भारतीय संघाने एकही T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली नाही. त्यामुळे हा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न रोहित शर्मा करेल. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा अशी कोट्यवधील क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.
टी-२० विश्वचषक २०२४साठी भारताचा संघ:
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.