भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याना एका मुलाखतीदरम्यान आपले आवडता भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कोण असा सवाल केला असता त्याने आक्रमक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा तसेच गोलंदाज म्हणून जसप्रीत बूमराह यांचे नाव घेतले. हरभजन सिंगने रोहित शर्माचे वर्णन प्रत्येक फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज असे केले आहे.
हरभजन सिंग म्हणाला की, टी-20 असो, एकदिवसीय क्रिकेट असो, कसोटी क्रिकेट असो, रोहित जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा त्याची फलंदाजी ही अविश्वसनीय असते असे हरभजन म्हणाला. रोहितकडे खूप वेळ आहे, तो फलंदाजी करताना खूप सोप्पी वाटते. मला वाटते की विराट कोहली आणि केएल राहुल यांसारख्या इतरांच्या मानाने रोहित हा कदाचित जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. विराट तितकाच चांगला आहे पण जेव्हा रोहित खेळतो तेव्हा त्याची खेळण्याची लेव्हल पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे रोहित माझा आवडता फलंदाज आहे.
माझ्या मते रोहित शर्माने तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार असावा. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्याला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार करायला हवा.”बुमराहबाबत हरभजन सिंग म्हणाला की, जसप्रीत बुमराह हा टी-20, एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेटचा उच्च दर्जाचा गोलंदाज आहे. त्यामुळे रोहित आणि बुमराह हे माझे दोन आवडते खेळाडू आहेत.