विमानतळावर रोहितने वर्ल्डकप उंचावला, अन चाहत्यांचा जल्लोष (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडलेला ट्वेन्टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकून टीम इंडिया आज मायदेशी भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी सात वाजता भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यावेळी आपल्या चॅम्पियन खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चाहत्यांकडे बघत विश्वचषक उंचावून दाखवला. आणि एकच जल्लोष सगळीकडे पाहायला मिळाला. याबाबतचा विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडतानाहीच ती ट्रॉफी आहे जी बघायला चाहत्यांचे डोळे आसुसले होते. त्यामुळे वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. टीम इंडियाचे खेळाडू आता दिल्लीतील आयटीसी मौर्य या हॉटेलमध्ये काहीवेळ आराम करतील. त्यानंतर 11च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जातील. त्यानंतर दुपारी 2 ते 3च्या सुमारास भारतीय संघ मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

आज कसा असेल टीम इंडियाचा कार्यक्रम

06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान