सगळीकडे रोहित शर्माचीच हवा…. कर्णधार म्हणून पहिलीची मालिका, अन् रोहित ठरला मालिकावीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्वची T२० सिरीज मध्ये ३-० ने जिंकून नवा इतिहास रचला. विशेष म्हणजे नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माची हि पहिलीच मालिका होती. आणि याच मालिकेत रोहित शर्माने मालिकावीर पुरस्कार मिळवून आपली झलक दाखवली

३ सामन्यांच्या या मालिकेत कर्णधार रोहित शर्माने तुफानी बॅटिंग करत २ अर्धशतकी खेळ्या केल्या. तसेच पहिल्या सामन्यात ४८ धावा केल्या. रोहितच्या या दमदार खेळीने भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या जोडीने आपल्या पहिल्याच सिरीज मध्ये दमदार परफॉर्मन्स दाखवत भारतीय क्रिकेट ला अजून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय

तत्पूर्वी, तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने आपले आवडते ईडन गार्डन्स स्टेडियम गाजवले. त्याने ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षट्कारांचा तडाखा देत ५६ धावांची शानदार खेळी करत भारताच्या आव्हानात्मक धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. तर युवा फलंदाज इशान किशनसोबत ६ ९ धावांची सलामी देत रोहितने भारताला चांगली सुरुवात करून दिली.

You might also like