तिकडे रोहित शर्माने 30 चेंडू खेळले आणि इकडे या काकांना अर्धी मिशी काढावी लागली ; पहा नक्की काय आहे प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने संघात पुनरागमन करत दमदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन संघाच्या भेदल माऱ्यासमोर रोहितने सुरुवातीला धीराने फलंदाजी केली. पण याबरोबरच एकीकडे रोहितच्या पुनरागमनाची जरी चर्चा असली तरी दुसरीकडे त्याच्यामुळे अर्धी मिशी कापावी लागलेल्या एका काकांची देखील चर्चा आहे.

त्याचं झालं असं की एका ट्विटरकर्त्याने सिडनी कसोटीआधी ट्विटरवर प्रश्न विचारला होता की ‘रोहित शर्माचा अंतिम अकरा मधे समावेश करण्यासाठी कोणाला डच्चू देण्यात यावा.?’ या प्रश्नावर @Ajay81592669 नावाच्या एका ट्विटरकर्त्याने ‘रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम पुरुष आहे. ब्राॅड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो,’ असे उत्तर दिले होते.

विशेष म्हणजे रोहितला मयंक अगरवालच्या जागेवर सिडनी कसोटीत स्थानही मिळाले आणि त्याने ३० च काय पण तब्बल ७७ चेंडू खेळून काढले. त्यामुळे @Ajay81592669 या ट्विटरकर्त्या काकांनी चक्क खरंच त्यांचा शब्द पाळला आणि अर्धी मिशी काढून सर्वांना आश्चर्यचकीत केले.

https://twitter.com/Ajay81592669/status/1347427598884773890?s=19

 

त्यांनी म्हटले आहे की ‘बऱ्याच जणांनी मी अर्धी मिशी काढल्याबद्दल मला नावे ठेवली. पण मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान होता आणि आहे. तरी देखील मी सिडनी डोळ्यासमोर असताना पैज लावण्याची चूक केली. म्हणून खूप विचारांतीच मी अर्धश्मश्रूमुंडन केलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment