परभणीतील मुरंबा गावात 900 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू ; गाव परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून केले घोषीत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे कुकुट पालन करणार्‍या शेतकर्‍यांवर संकट कोसळले असून, गावातील कुकुट पालना मधील, पक्षी मृत झाल्याची घटना समोर आली आहे. मागील दोन-तीन दिवसापासून मुरुंबा शिवारातील कुकूटपालन करणाऱ्या तीन ते चार शेतकऱ्यांच्या शेडमधील, कोंबड्या मरून पडत असून त्याची माहिती व संवर्धन विभागाला देण्यात आली होती.

पशुसंवर्धन विभागानेही घटनेचा त्वरित दखल घेत, कुकुट पालन केंद्रांना भेट दिल्या असून, या ठिकाणी मृत आढळलेल्या पक्षांचे नमुने, पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. पुढील एक-दोन दिवसात प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच, या कोंबड्या मरण्याचे नेमके कारण पुढे येणार आहे. परंतु घडलेल्या घटनेमुळे, गाव आणि परिसरामध्ये बर्ड फ्लू पसरला असल्याची अफवा मात्र जोर धरू लागली आहे.

यावर गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, परंतु अहवाल आल्याशिवाय बर्ड फ्लू समजू नये. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. दरम्यान या घटनेची जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गंभीर दखल घेतली असून गाव व परिसरातील पाच किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like