हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव करत दुसरा विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma Records) वादळी शतक मारून अफगाणी गोलंदाजांचा घाम काढला. रोहितने अवघ्या 84 चेंडूत 131 धावांची आक्रमक खेळी केली. यावेळी त्याने तब्बल 5 गगनचुंबी षटकार ठोकले. या खेळी दरम्यान, रोहितने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट मध्ये जगातील सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकत त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
ख्रिस गेलच्या नावावर 553 षटकारांची नोंद होती. मात्र रोहितने कालच्या सामन्यात ५ षटकार मारल्याने त्याच्या नावावर आता 556 सिक्स आहेत. ख्रिस गेलने 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 551 डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याचवेळी रोहितने केवळ 453 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 473 व्या डावात हा विक्रम केला. या दोघानंतर शाहिद आफ्रिदी ( 476 सिक्स), ब्रैंडन मैकुलम (398 सिक्स ), मार्टिन गुप्टिल (383 सिक्स) यांचा क्रमांक लागतो.
कपिल देव यांचाही रेकॉर्ड मोडला – Rohit Sharma Records
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहितने कपिल देव यांचाही विक्रम (Rohit Sharma Records) मोडीत काढला. रोहितने वर्ल्डकपमधील सर्वात जलद शतक बनवण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. रोहितने अवघ्या 63 बॉल मध्ये आपले शतक पुर्ण केले. याआधी 1983 मध्ये झिम्बाबे सोबत झालेल्या मॅचमध्ये कपिल देव यांनी 72 बॉलमध्ये सर्वात जलद शतक बनवन्याचा रेकॉर्ड केला होता.
रिकी पॉन्टिंगला सुद्धा टाकलं मागे –
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहितने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 31 शतक ठोकले. यावेळी त्याने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगला सुद्धा मागे टाकलं . पाँटिंगच्या नावावर 30 शतके होती. तर सचिन तेंडुलकर या यादीत 49 शतकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.