हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शुभमन गिल शून्यावर बाद झाल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांची पिसे काढली. रोहितने फक्त 78 चेंडूत 80 धावा करून देखील परंतु तरीही लंच पर्यंत भारताची धावसंख्या 3 बाद 106 अशी झाली आहे.
भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र दमदार खेळ सुरू ठेवला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा वेळोवेळी समाचार घेत त्याने अर्धशतक लगावले. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक ठरले. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने आणि इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितला चांगली सुरूवात मिळूनही त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणं शक्य होत नव्हते. पण दुसऱ्या कसोटीत त्याने अर्धशतक ठोकत टीकाकारांना बॅटने उत्तर दिलं.
परंतु दुसऱ्या बाजूला भरवशाचा चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली लवकर बाद झाल्याने भारतीय संघावरील संकट मात्र टळलेले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’