Friday, January 27, 2023

रोहित शर्माची केबीसी मध्ये अचानक एन्ट्री; देवाशी कसं बोलायचं म्हणत चाहता झाला भावूक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माचे देशभरात खूप चाहते आहेत. असाच एक प्रांशु त्रिपाठी नावाचा चाहता कौन बनेगा करोडपती मध्ये आला असता अमिताभ बच्चन यांनी अचानक रोहित शर्माशी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधला आणि प्रांशु त्रिपाठी अवाक झाले.

अचानक रोहित शर्मा ला समोर पाहून प्रांशु भावनिक झाले. बिग बी प्रांशुला रोहितशी बोलण्यास सांगितले असता भारावलेल्या प्रांशुने म्हंटल की, देवाशी कसे बोलता येईल. दरम्यान, रोहित शर्माने प्रांशू त्रिपाठी याना जास्तीत जास्त पैसे जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या

- Advertisement -

दरम्यान, प्रांशु त्रिपाठी रोहित शर्मा चे खूप मोठे चाहते असून आपल्या पॉकेट मध्ये त्यांनी रोहित शर्मा चा फोटो सुद्धा ठेवला आहे. रोहित शर्मा सध्या आयपीएल मध्ये व्यस्त आहे. दरम्यान, रोहित शर्मा चा केबीसी मधील हा व्हिडीओ कॉल जोरदार व्हायरल होत असून फॅन्स च्या प्रतिक्रिया उमटत आहेत.