हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर विराट कोहलीच्या जागी उपकर्णधार रोहित शर्मा हाच भारताचा कर्णधार असल्याची शक्यता आहे.बीसीसीआय कडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ‘रोहित शर्माला भारताचा नवा कसोटी कर्णधार बनवण्यात येईल यात शंका नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, त्यामुळे तो कर्णधारपदासाठी सज्ज झाला असून लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते. रोहितवर कामाचा खूप ताण असेल, त्याला स्वतःला खूप तंदुरुस्त ठेवावे लागेल. मला वाटते की निवडकर्त्यांनी त्याच्याशी चर्चा केली असेल. त्याला त्याच्या फिटनेसवर जास्त मेहनत करावी लागणार आहे.
आगामी काळात श्रीलंकेविरुद्धतील मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित फुल्ल टाइम कसोटी कर्णधार असेल. त्याचवेळी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याकडे बीसीसीआय भावी कर्णधार या दृष्टीने पाहत आहे. या दोघात कोणाला उपकर्णधार करायचं यावर बीसीसीआय विचार करत असून यातील जो उपकर्णधार असेल तोच भारताचा भविष्यातील लीडर असेल असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं