प्रश्न विचारायला नाही तर प्रश्न सोडवायला अक्कल लागते; चित्रा वाघ यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी विरोधकांवर टीका केली होती की, प्रश्न विचारायला अक्कल लागते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर प्रश्न सोडवायला अक्कल लागते. जर थोडी अक्कल शिल्लक राहिली असेल तर सरकाने महिलांच्या रक्षणासाठी वापरावी,” अशी टीका वाघ यांनी केली.

चित्रा वाघ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी टीका करताना प्रश्न विचारायला अक्कल लागते असे म्हंटले. वास्तविक पाहता दोन वर्षांमध्ये या महाविकास आघाडी सरकारची अक्कल कुठे गेली होती? या सरकारची अक्कल ही खंडणी गोळा करणे, गांजा बहाद्दरांना, गुन्हेगारांना वाचवण्यामध्ये वाया गेली आहे.

यावेळी चित्रा वाघ यांनी अभिनेता किरण माने याच्या प्रकरणावरबाबतही मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, किरण माने याने मालिकेतून काढल्यानंतर नवीन नाटक उभे केले आहे. अशा हरामखोरांना शिक्षा व्हायला पाहिजे. कायदा हा सर्वांना समान आहे. महिलांचा अवमान करणे, त्यांना अपशब्द वापरणे हे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या महिलांच्या पोस्ट आहेत. माने काळे आहे की गोरा हे देखील मला माहिती नाही. मात्र, कायदा हा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे त्याप्रमाणे सर्वांना शिक्षा व्हावी, अशी मागणी वाघ यांनी केली.

Leave a Comment