हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केल्यामुळे मुंबईचे आणि खास करून रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर याबाबत अजूनही उलटसुलट चर्चा सुरूच आहेत. विंडो ट्रेंडमधून मुंबईने हार्दिकला विकत घेतलं आणि थेट कर्णधार सुद्धा करून टाकलं. त्यामुळे ज्या रोहितने मुंबईला मोठा संघ बनवला त्याच्यावर कुठेतरी अन्याय झाल्याची भावना क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. परंतु आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुमचा लाडका रोहित पुन्हा एकदा मुंबईच्या कप्तानच्या रूपात दिसू शकतो. कसे ते जाणून घेऊया…
रोहित शर्माने आत्तापर्यंत मुंबईच्या संघाला तब्बल 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलं, मात्र गेल्या ३ सीजन मध्ये मुंबईला खास म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबईने थेट रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं. मात्र हार्दिक अजूनही दुखापत ग्रस्त आहे. अशा परिस्थिती सुरुवातीच्या काही सामन्यांना त्याला मुकावं लागू शकते. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यासाठी मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा रोहितला कर्णधार करू शकते. रोहित तयार नसेल तर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा पर्याय सुद्धा मुंबई समोर आहेच.
विश्वचषक स्पर्धेत हार्दिकला दुखापत –
नुकत्याच पार पडललेया विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यावेळी हार्दिकच्या अँकलला दुखापत झाली होती. आणि यानंतर तो संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडला होता. अँकलमधील 1 लिगामेंट फाटल्याने हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा मैदानात उतरायला उशीर लागू शकतो. त्यामुळे हार्दिक सुरुवातीच्या काही सामन्यात मुकू शकतो. अशावेळी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती येण्याची शक्यता आहे.