सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मिरज तालुक्यातील आरग येथे एका रात्रीत सात ते आठ चोरट्यांनी जैन मंदिरासह सहा दुकाने व गोडाऊन फोडून सुमारे २० हजारांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांकडून एकास जबर मारहाणदेखील करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.आरग येथील ओम ज्वेलर्स, जैन श्वेतांबर मंदिर, दुकाने, धान्य गोडाऊनसह एका घरावर चोरट्यांनी डल्ला मारला; परंतु चोरट्यांच्या हाती फारसा काही ऐवज लागला नाही. या सहा चोर्यांमध्ये सुमारे २० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचा अंदाज आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.
ऐनापुरे यांच्या घरी चोरी होत असताना. शेजारील एक मुलगा लघुशंकेसाठी उठला असताना त्याने चोरट्यांना पहिले त्यावेळी चोरट्यांनी त्याच्या पायावर काठीने मारून पळ काढला. चोरीच्या घटनेमुळे आरगमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी ग्रामीण भागाता गस्त वाढविण्याची मागणी आता ग्रामस्थांतून होत आहे.