तत्वतः मंजूरी : सातारा जिल्ह्यातील तीन गडावर आता रोप- वे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोल्हापूर- कागल राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याकरीता 2009 कोटी रूपये, खंबाटकी दुस-या बोगदयाच्या उर्वरित कामासाठी 493 कोटी आणि कराड-चिपळुण नवीन राष्ट्रीय महामार्गाचे कामासाठी असे मिळुन, रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 3000 कोटी रूपयांची उपलब्धता करण्यात आली आहे. तर प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड रोप-वे च्या प्रस्तावाला नितिन गडकरी यांनी तत्वत: मंजूरी देवून, पुरेसा निधी देण्याचे मान्य केले आहे. रोप-वे मुळे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्टया सातारा जिल्हयाच्या विकासाला एक वेगळी उंची आणि चालना मिळणार आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्ली येथून दिली आहे.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाकरीता तसेच बोगद्याच्या कामाकरीता निधीची मागणी सातारा जिल्हयातील तीन ठिकाणच्या रोप-वे चा दिलेला प्रस्ताव तसेच सातारा जिल्हयासह पश्चिम महाराष्ट्राच्या विविध विकासकामांचा पाठपुराव्याच्या अनुषंगाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, चालु अधिवेशन काळात, रस्ते वाहतुक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंत्रालयात सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करताना, किल्ले अजिंक्यतारा किल्ले प्रतापगड आणि सज्जनगड या किल्ल्यांवर जाण्यासाठी रोप-वे चा प्रस्तावास नितिन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच प्रदान करण्यात येईल असे ठामपणे सांगितले आहे.

तसेच राष्ट्रीय महामहार्गाचे शेंद्रे ते कागल टप्प्यातील सहापदरीकरणाचे कामास रूपये 2009 कोटी आणि खंबाटकी बोगदयाच्या उर्वरीत कामासाठी 493 कोटी रूपये, तर चिपळुण ते कराड या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी देखिल मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचे नितिन गडकरी यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

कामाची निकड आणि आमची मागणी विचारात घेवून, नागरीकांच्या हितासाठी सुमारे 3 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीची उपलब्धता करून दिल्याबददल गडकरी यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आभार मानलेच तथापि तमाम जनतेच्या वतीने धन्यवाद देखील दिले आहेत.

Leave a Comment