औरंगाबाद : शहरातील वाढत्या करून संसर्गाच्या विळख्यात स्मार्ट सिटी बस सेवा अडकली आहे. कोणाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सिटीबस ची प्रवासी संख्या अचानक कमी झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन ते हरसुल, सिडको ते मिटमिटा यासह काही मार्गांवरील वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी ने घेतला आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे रोजची रुग्ण संख्या वाढत चालली आहे.संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने 11 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अंशतः आणि या काळातील दर शनिवार रविवारी शंभर टक्के लाभ डाऊन जाहीर केला आहे.या शनिवार-रविवारी स्मार्ट सिटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी बस विभागाने घेतला आहे. आता वाढत्या करूनच संसर्गामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने काही मार्गावरील वाहतूक सेवा करण्याचा निर्णय स्मार्ट बस विभागाने घेतला आहे.
यात मार्ग क्रमांक 3 – रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट, मार्ग क्रमांक 16 – सिडको ते मिटमिटा, मार्ग क्रमांक 18 – सिडको ते रेल्वे स्टेशन, मार्ग क्रमांक 21 – रेल्वे स्टेशन रिंगरुट हे मार्ग आहेत. अल्प प्रवासी मुळे मार्ग क्रमांक 6 – औरंगपुरा ते बजाज नगर, मार्ग क्रमांक – 17 सिडको ते विद्यापीठ, मार्ग क्रमांक – 30 सिडको ते बजाज नगर ते कमी करण्यात आले आहेत. पुढील परिस्थितीनुसार सेवेत बदल केले जातील, असे स्मार्ट सिटी बस विभागाचे व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group