हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : बुलेट रॉयल इन्फिल्ड (Royal Enfield) या टू व्हीलर बाईक आजच्या तरुण पिढीतील आकर्षण ठरत आहे. ही बाईक भारतातील प्रीमियम टू व्हीलर सेगमेंटमध्ये अती लोकप्रिय बाईक असुन रॉयल एनफिल्ड मोटर्स ही भारतीय मोटारसायकल निर्माण कंपनीची बाईक आहे. नुकतीच बाजारात आलेली रॉयल इफिल्ड बुलेट 350 ही तुम्ही चक्क 30 हजार रुपयात घरी आणू शकतात. आकर्षक क्लासिक लुक आणि पॉवरफुल इंजिनमुळे ही बाईक सर्वांना जास्तच आवडायला लागली आहे. उच्च मायलेज सोबतच वेगवेगळे आधुनिक फीचर्स देखील या बाईक मध्ये आहे.
या प्रीमियम क्रूझर बाइकच्या इलेक्ट्रिक स्टार्ट व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1,66,337 रुपये आहे. तसेच ऑन-रोड असताना 1,91,925 रुपये होते. तुम्हाला देखील ही बाईक घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त 2 लाख रुपये भरून घेता येईल त्याच बरोबर 2 लाख रुपये नसेल तरीही तूम्ही 30 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट वर ही बाईक घेऊ शकतात. कारण ही कंपनी आपल्या प्रीमियम बाईक रॉयल एनफील्ड बुलेट 350 वर आकर्षक वित्त योजना ऑफर देत आहे जेणेकरून तूम्ही 30 हजाराच्या डाऊन पेमेंट वर ही रॉयल एन्फिल्ड बुलेट 350 घेऊ शकतात.
काय आहे ऑफर –
या बुलेट चे इलेक्ट्रिक स्टार्ट वेरियंट घेण्यासाठी बँकेकडून आँनलाईन डाऊन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरचा विचार करून 191925 रुपयांचे कर्ज तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर कंपनीला 30,000 रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल. बँके कडून हे कर्ज 3 वर्षांसाठी म्हणजेच 36 महिन्यांसाठी देण्यात येते आणि त्यावर तुम्हाला वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज द्यावे लागते. या कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी, तुम्ही दरमहा बँकेला 5,202 रुपये महिन्याला EMI देखील देऊ शकतात.
Royal Enfield चे फीचर्स –
ही बाईक 346 सीसी इंजिन सोबत देण्यात येते. हे इंजिन 5स्पीड गिअर बॉक्सला जोडलेले असून 19.36 Ps पॉवर आणि 28 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता ठेवते . तरुणाईच्या मनात भुरळ घालणाऱ्या या सर्वोत्तम क्रूझर बाइकमध्ये तुम्हाला 38 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज मिळते. गाडीचा लूक आणि डिझाईन पाहूनच तुम्ही या बाईकच्या प्रेमात पडाल यामध्ये काही शंका नाही.