सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
म्हसवड येथील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेल्या श्री सिध्दनाथ आणि देवी जोगेश्वरी मंदीर देवस्थानचा पारंपारिक शाही विवाह सोहळा सोमवारी दि.15 रोजी रात्री बारा वाजता संपन्न झाला. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे लोकांना या शाही विवाहापासून दूर रहावे लागेल होते. मात्र यंदा भाविक उत्साहाने सोहळ्यात सहभागी झाले होते.
म्हसवड येथे कार्तिक प्रतिपदा दिपावली पाडवा ते मार्गशिर्ष प्रतिपदा देवदिवाळी दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा विविध धार्मिक कार्यक्रमाने हा विवाह सोहळा संपन्न होत असतो. यावेळी श्रींच्या या मंगलमय शाही विवाह सोहळ्यानिमित्त मंदीर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/226652932772383
सोहळ्यानिमित्त रात्री गजी नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा पारंपारिक विवाह सोहळा पार पडतो. या विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होते.