चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होती दिव्यांग व्यक्ती, पाय घसरला आणि.. पाहा व्हिडीओ..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । चालत्या ट्रेनमध्ये चढू नका अशी वारंवार सूचना रेल्वे प्लेटफॉर्म आपल्याला ऐकायला मिळत असते. मात्र, बऱ्याचदा घाईघाईत प्लेटफॉर्मवरून सुटणारी ट्रेन पकडण्यासाठी अनेक जण चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयन्त करतात. मात्र, चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयन्त नेहमीच जीवावर बेतण्याची शक्यता असते. पनवेल स्टेशनवर असाच काहीसा प्रकार प्लेटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या व्हिडिओत पनवेल स्टेशनवरील एका प्लेटफॉर्मवरून एक ट्रेन नुकतीच निघाली आहे. या चालत्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी एक दिव्यांग धावताना दिसत आहे. कसातरीती दिव्यांग व्यक्ती बोगीच्या हॅण्डलला पकडून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयन्त करते. अचानक तितक्यात ट्रेनवर चढताना रेल्वे बोगीच्या हॅण्डलवरून या दिव्यांगांचा एक हात निसटतो आणि तो बोगीबरोबर फरफटत जातो. मात्र, काही क्षणात प्लेटफॉर्मवरील रेल्वे सुरक्षा पोलीस दलातील एका जवानाने प्रसंगवधान दाखवत त्या दिव्यांग व्यक्तीला मागे खेचत त्याचे प्राण वाचवले.

ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळं चालत्या ट्रेनमध्ये चढणे हे किती धोकादायक आहे हे या व्हिडिओवरून दिसत आहे. याशिवाय पोलीस जवानाच्या प्रसंगवधानामुळं त्या दिव्यांग व्यक्तीचे प्राण वाचले. त्यामुळं व्हिडिओमधील रेल्वे पोलीस जवान कौतुकास पात्र आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.