गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे स्टेशनवर आपल्या चुकीमुळे अनेक अपघात होत असतात. कधी कधी यामुळे आपल्याला जीवदेखील गमवावा लागतो. मागच्या आठवड्यात मुंबईच्या कांदिवली रेल्वे स्थानकावर अशीच एक दुर्घटना समोर आली होती. एक शालेय विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत रेल्वे फलाटावर मजा मस्ती करत असताना रेल्वे रुळाच्या दिशेला गेला. त्याचा फलाटावरुन तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी पाठीमागून लोकल ट्रेन आली आणि त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्या घटनेनंतर आता गोंदिया रेल्वे स्थानकावर अशीच काहीशी घटना घडली मात्र यामध्ये सुदैवाने दोन महिलांचे प्राण वाचवण्यात आरपीएफ जवानाला यश (rpf save two women life) आलं आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकात विचित्र घटना, एक महिला जमिनीवर कोसळली, दुसरी ट्रेनला लटकली आणि… pic.twitter.com/xc39P7gLX5
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 28, 2022
काय घडले नेमके ?
गोंदिया रेल्वे स्थानकावर धावती ट्रेन पकडणे दोन महिलांच्या जीवावर बेतू शकलं असतं. कारण दोन महिला या धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत (rpf save two women life) होत्या. यापैकी एक महिला थेट फलाट आणि रेल्वे रुळाच्या मध्याभागी असलेल्या जागेत खाली पडली असती मात्र सुदैवाने ती वाचली. तर दुसरी महिला ही आपल्या पतीला पकडून ट्रेनमध्ये चढत होती. पण तीदेखील खाली पडली असती. यावेळी धावत आलेल्या आरपीएफ जवानाने (rpf save two women life) या महिलेचे प्राण वाचवले. हि संपूर्ण घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गोंदिया येथील रेल्वे रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ट्रेन क्रमांक 22815 एर्नाकुलम एक्सप्रेस दुपारी 1.49 वाजता आली आणि 1:52 सुटली. यावेळी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला प्रवासी स्लीपर कोचमध्ये प्लॅटफॉर्मवर पडली. आणि दुसरी महिला प्रवाशी एस-4 कोचच्या दारात उभ्या असलेल्या पतीची कंबर धरून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचा यावेळी तो जाऊन ती पडत असताना स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ जवान प्रमोद कुमार यांनी तत्परता दाखवून तातडीने त्या महिलेला सुरक्षितपणे स्वत:कडे (rpf save two women life) खेचले आणि ट्रेनच्या खाली जाण्यापासून वाचवले.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर