‘मी बिडी पित नाही.. म्हणून मला ईडीची भीती वाटत नाही.. ‘ आठवलेंची कोपरखळी

0
65
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस दिलीय. यानंतर राऊत यांनी भाजपला आव्हान देणारे ट्विट केलं होत. त्यांच्या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनीही आपल्या यमक अंदाजात उत्तर दिले आहे. ‘आपण बिडी पित नाही, त्यामुळे आपल्याला ईडीची भीती वाटत नाही,’ अशी मिश्कील टिपण्णीही आठवले यांनी केली. ते आज शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नोटीस आल्याची बातमी आल्यानंतर राऊत यांनी केलेल्या ट्विटची चर्चा झाली. ‘आ देखे जरा किसमे कितना हे दम’, असे ट्विट राऊत यांनी केले होते. त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले किसमे कितना हैं दम, तो हम भी नही कुछ कम, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ती पक्ष पाहून काम करीत नाही. भाजपच्या लोकांनाही ईडीच्या नोटीसा येतात. मात्र, आपला असा कुठलाही व्यवसाय नाही. त्यामुळे आपल्याला ईडीची भीती नाही. बिडी पित नसल्याने इडीची भीती वाटत नाही. पैसा कमावावा, पण तो सनदशीर मार्गाने कमावावा. योग्य ते कर भरावेत. कागदपत्रे पूर्ण करावीत. असे असेल तर कशाला अशी कारवाई होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ईडीला माहिती देणारे अनेक जण असू शकतात. अंजली दमानिया यांनीही एकनाथ खडसे यांच्यासंबंधी अनेक तक्रारी केल्या आहेत. खडसे यांनी पक्षांतर करायला नको होते. अर्थात त्यांनी पक्षांतर केले म्हणून ईडी कारवाई करीत आहे, असेही नाही. त्यांना विधानसभेला संधी मिळाली नाही, म्हणून नाराज होण्याची गरज नव्हती. त्यांच्यासोबत संधी मिळू न शकलेल्या अन्य नेत्यांना आता जशी विविध ठिकाणी संधी मिळाली, तशीच खडसे यांनाही मिळाली असती. त्यांनी थोडे थांबायला हवे होते, असेही आठवले म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here