हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या Flipkart वर 30 जानेवारी पासून Infinix Note 12i हा स्मार्टफोन विकला जाणार आहे. या स्मार्टफोनची भारतातील सिंगल 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये असेल. तसेच यामध्ये मेटाव्हर्स ब्लू आणि फोर्स ब्लॅक हे कलर ऑप्शन मिळतील. यासोबतच Flipkart Axis Bank ट्रान्सझॅक्शनवर ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. चला तर मग या स्मार्टफोनची फीचर्स जाणून घेऊयात…
बॅटरी बाबत बोलायचे झाल्यास, या Infinix Note 12i मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. तसेच ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देईल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS आणि USB Type-C पोर्ट दिला गेला आहे.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास Infinix Note 12i या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. या सेटअपमधील प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. याशिवाय 2MP डेप्थ सेन्सर आणि QVGA रिझोल्यूशन असलेला कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटमध्ये 8MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यासोबत ड्युअल एलईडी फ्लॅश आहे.
तसेच, Infinix Note 12i या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले असेल. ज्याचा 1,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. तसेच या डिस्प्लेमध्ये गोरिला ग्लास 3 कव्हर देखील मिळेल.
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 12 बेस्ड कंपनीच्या XOS 12.0 कस्टम स्किनवर काम करतो. या फोनमध्ये 4GB रॅम सहीत MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत इंटरनल मेमरी वाढवता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.googleadservices.com/pagead/aclk?sa=L&ai=DChcSEwj7ztaO_-f8AhV-
हे पण वाचा :
LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!
Jio कडून कमी किंमतीत भरपूर डेटा देणारे 2 रिचार्ज प्लॅन लॉन्च, जाणून घ्या या प्लॅनचे अतिरिक्त फायदे
Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या
Gram Suraksha Yojana द्वारे दररोज 50 रुपयांची बचत करून मिळवा 35 लाख रुपये
Multibagger Stock : चॉकलेट बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले तिप्पट