तर सरकारी कार्यालयांमधेही भरणार संघाच्या शाखा

RSS
RSS
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ | मध्यप्रदेश मधे सध्या विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण पेटले आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास संघाच्या शाखांवर बंदी आणू असे वक्तव्य केले होते. याला प्रत्यत्तर देत भाजपा ने सत्ता आल्यास संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील असे म्हटले आहे.

भाजपचे शिवराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत मध्यप्रदेश मधे भाजप चे सरकार आल्यास संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील आणि सरकारी कर्मचारीदेखील शाखांमध्ये सहभागी होतील असे म्हटले आहे. संघाच्या शाखांवर कोणीही बंदी आणू शकत नाही, असं सिंह यांनी यावेळी म्हटलं आहे. ते खरगोनमध्ये बोलत होते.

खरगोन जिल्ह्यातील एका प्रचारसभेत शिवराज सिंह यांनी सोमवारी भाषण केलं. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल आणि त्यातील शाखांवरील बंदीच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सरकारी कार्यालयांमध्येही शाखा भरतील, असं उत्तर त्यांनी दिलं. ‘फक्त सरकारी कर्मचारीच नाही, तर प्रत्येक देशभक्त शाखेत जाऊ शकतो. कारण संघ ही देशभक्तांची संघटना आहे,’ असं सिंह यांनी म्हटलं.

 इतर महत्वाचे –

तुम्ही हे सरकार खाली का नाही खेचत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा RSS ला सवाल

मी देवाला प्रार्थना करतेय की फक्त एकदा अटलजींना भाषण करताना मला पाहुदे – वाजपेयींची भाची