गणेशोत्सवानिम्मित पुणे पालिकेकडून गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर; ‘या’ असतील महत्वाच्या सूचना

Ganesh Celebration Pune (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गणेशोत्सव सणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे सर्व गणेश भक्तांची लगबग दिसून येत आहे. आता गणेशोत्सव निमित्ताने आणि नवरात्रोत्सवासाठी पुणे महापालिकेकडून देखील महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत गणेश मंडपाची लांबी किती असावी, गणपती बाप्पाच्या मुर्त्या किती फुटाच्या असाव्यात याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचना गणेश भक्तांनी पाळणे बंधनकारक आहेत.

महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे

1) महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या नियमानुसार, उत्सव मंडपाची उंची ४० फुटापेक्षा जास्त नसावी आणि जर ४० फुटांपेक्षा जास्त असेल तर त्याला अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जोडावे. कोणत्याही परवानगी विना उंची वाढवल्यास कारवाई केली जाईल.

2) गणपती उत्सवासाठी घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परवानगीसाठी पुणे महापालिकेतर्फे कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, परवाना दिलेल्या जागेत काही चुकीचे आढळले किंवा वाद झाले तर त्यावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार महापालिकेला असेल.

3) मुख्य म्हणजे, पालिकेकडून देण्यात येणाऱ्या परवानग्या या मागील वर्षांपासून पुढील ५ वर्षांसाठी ग्राह्य धरल्या जातील. यामध्ये उत्सव मंडप, स्वागत कमानी, रनिंग मंडपांच्या परवांग्यांचा समावेश असेल. या परवानग्या घेताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

4) तसेच यावर्षीच्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करायचा आहे त्यांना नविन जागेसाठी सर्व परवानग्या पुन्हा घेणे आवश्यक आहेत. मंडळाच्या जागेत किंवा प्रकल्प बाधित झाल्यास पुणे महापालिकेकडून मंडळाला पुन्हा परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगी नंतरच मंडळ पुढील गोष्टी करु शकेल.

5) त्याचबरोबर, २०१९ च्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित क्षेत्रीय कार्यालय, पोलिस ठाण्याकडून गणेश मंडळांनी सर्व परवानग्या घेणे बंधनकारक असेल. यावर्षी देखील २०१९ च्या किंवा नव्याने घेतलेल्या परवान्यांची प्रत मंडप, कमानींच्या दर्शनी भागावर लावावी लागेल.

6) कोणतेही गणेश मंडळ उभारताना अग्निशमन, रुग्णवाहिका, प्रवासी बस जाण्यासाठी मंडळाच्या लगतचे रस्ते मोकळे ठेवावेत. त्यासाठी मंडळाच्या कमानीची उंची १८ फूटपर्यंत ठेवावे.

7) गणेश मंडळांनी जास्त प्रमाणात शाडूच्या गणपती मूर्तींना प्राधान्य द्यावे. आवश्यकतेनुसार स्वयंसेवक / सुरक्षारक्षक देखील नेमावेत. तसेच मंडळात किंवा परिसरात गर्दी होणार नाही कोणाला हानी होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.

8) गणेश मंडळांनी, विविध संस्था, संघटना, नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये योगदान द्यावे. तसेच नागरिकांना दोन्ही प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी.

9) गणेश मंडळांनी मांडव, कमानीसाठी उच्च न्यायालयाकडून आलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे. गणेश उत्सव संपल्यानंतर सर्व मंडळांनी तीन दिवसांच्या आत मांडव, देखावे, कमानी उतरवून घ्याव्यात. तसेच रस्त्यावर ठेवण्यात आलेले साहित्य हटवावे.

10) गणेश मंडळ उभारण्यासाठी जे काही रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले आहेत ते सर्व स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रेटने बुजवून टाकणे बंधनकारक असेल. गणेश उत्सवाच्या काळात जर मंडळांमध्ये जागेबाबत वाद निर्माण झाले तर महापालिकेकडून परवाना रद्द करण्यात येईल.

11) पुणे महापालिकेकडून आलेले सर्व नियम पुणे जिल्ह्याच्या सर्व मंडळांना लागू असतील. महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही मंडळाला वैयक्तिक मंडळ बांधता करता येणार नाही. पालिकेच्या नियमावलीच्या बाहेर काही गोष्टी केल्यास त्यावर कारवाई होईल.